आमदगाव शिवारातून दिड लाखांचे इलेक्ट्रीक पोल लांबवले
An electric pole worth half a lakh was extended from Amdgaon Shivar बोदवड : चोरट्यांनी चक्क इलेक्ट्रीक पोल लांबवल्याचा धक्कादायक प्रकार बोदवड तालुक्यातील आमदगाव शिवारात घडला. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चंदन लिलाधर रडे (25, अयोध्या नगर, जळगाव) हे इलेक्ट्रीक कंत्राटदार आहेत. आमदगाव शिवारातील अमृत पटेल यांच्या शेत गट क्रमांक 101 मधून चोरट्यांनी 4 ते 8 नोव्हेंबरदरम्यान एक लाख 42 हजार 100 रुपये किंमतीचे सात लोखंडी इलेक्ट्रीक पोल लंपास केले. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रडे यांनी पोलिसात धाव घेत तक्रार नोंदवली. तपास हवालदार अय्युब गंभीर तडवी करीत आहेत.


