यावल तहसील कार्यालय आवारातून ट्रॅक्टरची बॅटरी लंपास


Tractor battery stolen from Yaval Tehsil office premises यावल : यावल तहसील कार्यालयामध्ये कंपाउंड वॉल नसल्यामुळे चोरट्यांना चांगलेच फावले आहे. चार दिवसांपूर्वी डंपर चोरीचा प्रयत्न झाला होता तर आता अवैध गौण खनिजाच्या एका जप्त केलेल्या ट्रॅक्टरची बॅटरी चोरीला गेल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. रात्रीदेखील तहसील कार्यालयात कोतवाल आणि शिपाई यांची गस्त असते मात्र या कर्मचार्‍यांच्या गस्तीवर लक्ष ठेवून अज्ञात चोरट्यांनी येथील साहित्य चोरी केली आहे.

चोर्‍यांमुळे वाहनधारकांमध्ये भीती
यावल शहरात सातोद रस्त्यावरील तहसील कार्यालयाला समोरून कंपाउंड वॉल आहे मात्र मागील बाजुस कंम्पाऊंडचे अपूर्ण बांधकाम आहे व मागील बाजू उघडीच आहे. कार्यालयाच्या मागून अज्ञात चोरट्यांकडून सहज शिरकाव होतो व येथील साहित्य चोरी होते. गेल्या चार दिवसांपूर्वीच थेट डंपर चोरीचा प्रयत्न झाला होता व आता येथून अवैध गौण खनिज वाहतूक करतांना पकडण्यात आलेल्या एका ट्रॅक्टरची बॅटरी चोरी केल्याने खळबळ उडाली आहे. आता प्रशासनाकडून सीसीटीव्ही तसेच इतर कर्मचार्‍यांकडून रात्रीची गस्त असतांना देखील बॅटरी कशी काय चोरीला गेली याबाबत अधिकारी वर्गाकडून माहिती घेणे सुरू आहे.



उभे असलेल्या या ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात चोरट्याने लांबवल्यामुळे कार्यालयाच्या आवारातील साहित्य सुरक्षीत नसल्याचे दिसुन येत आहे. यापूर्वीदेखील सात ट्रॅक्टरमधील टायर आणि सहा ट्रॅक्टरच्या सीट चोरी झालेल्या आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !