वर्ल्डकप : भारताने दिले ऑस्ट्रेलियाला 241 धावांचे आव्हान !


World Cup : India challenged Australia by 241 runs! अहमदाबाद : संपूर्ण देशाचे लक्ष लागून अहमदाबादमध्ये होत असलेल्या वर्ल्डकप सामन्याकडे लागून आहे. भारताने ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य दिले आहे. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत दोन गडी बाद 41 धावा केल्या आहेत. डेव्हिड वॉर्नर सात धावा तर मार्श 15 धावा करीत व स्टीव्ह स्मिथही आऊट झाला आहे. या विश्वचषकात टीम इंडिया पहिल्यांदाच ऑलआऊट झाली. दरम्यान, होमपीचवर होत असलेल्या सामन्यात भारतीय संघ करीष्मा करीत वर्ल्डकप पटकावण्याची देशवासीयांना आशा आहे.

ऑस्ट्रेलियापुढे 241 धावांचे आवाहन
अहमदाबादच्या पीएम नरेंद्र मोदी स्टेडियमवर नाणेफेक गमावल्यानंतर फलंदाजी करताना टीम इंडियाने 50 षटकांत 240 धावा केल्या. या विश्वचषकात टीम इंडिया पहिल्यांदाच ऑलआऊट झाली. भारतीय संघाकडून विराट कोहलीने 54 आणि केएल राहुलने 66 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 31 चेंडूत 47 धावा करत भारताला वेगवान सुरुवात करून दिली, मात्र उर्वरित खेळाडूंना हा वेग कायम ठेवता आला नाही. ऑस्ट्रेलियन संघाकडून मिचेल स्टार्कने 3 बळी घेतले. पॅट कमिन्सने 2 बळी घेतले.

कोहली 54 धावा करून बाद
भारताकडून तिसर्‍या क्रमांकावर फलंदाजीला आलेला विराट कोहली 54 धावा करून बाद झाला. त्याला पॅट कमिन्सने बोल्ड केले. पाचव्या षटकात फलंदाजीला आल्यानंतर विराटने झटपट धावा काढल्या, मात्र 3 विकेट पडल्यानंतर त्याने डाव मंदावला आणि टीम इंडियाचा ताबा घेतला.


कॉपी करू नका.