भुसावळात लेवा समाजाच्या वधू-वर मेळाव्यात 50 तरुण-तरुणींचा परीचय

आई-वडिलांनी ढवळा-ढवळ टाळल्यास संसार होईल सुखाचा : रमेश विठू पाटील

0

Introduction of 50 young men and women in bridegroom gathering of Lewa community in Bhusawal भुसावळ : आई-वडिलांनी आणि बहिणीने मुलांच्या संसारात ढवळाढवळ कमी केल्यास निश्चितच दाम्पत्याचा संसार सुखाचा होणार आहे. समाजात उच्च शिक्षितांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असून क्षुल्लक कारणातून विभक्त होण्याचे प्रमाणही वाढले आहे. हा प्रकार चिंताजनक असून कुठेतरी विचार करण्याची वेळ आली आहे. मुला-मुलींच्या संसारात आई-वडिलांनी ढवळा-ढवळ टाळावी, असा आग्रहाचा मौलिक सल्ला भोरगाव लेवा पंचायतीचे कुटूंब नायब रमेश विठू पाटील यांनी दिला. शहरातील संतोषी माता मंगल कार्यालयात रविवारी समाजाचा वधू-वर परीचय मेळावा झाला. यावेळी समाजातील 50 हून अधिक इच्छूक वर-वधूंनी आपला परीचय देत उच्चशिक्षीत वधू-वराची अपेक्षा व्यक्त केली.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ आयोजित लेवा पाटीदार वधू-वर परीचय संमेलनाच्या अध्यक्षस्थानी सकल लेवा समाजाचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील होते. यावेळी यावल-रावेर मतदार संघाच्या खासदार रक्षा खडसे, भुसावळचे आमदार संजय सावकारे, कृषी उत्पन्न बाजार समिती भुसावळचे सभापती अनिल वारके, ताप्ती एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन महेश फालक,
संतोषी माता सोसायटीचे चेअरमन वासु इंगळे, ग.स.सोसायटीचे कर्ज समितीचे अध्यक्ष योगेश इंगळे, बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्षा आशा कोल्हे, बहिणाई ब्रिगेडच्या जळगाव महानगराध्यक्ष प्रा.वैशाली झोपे, भोरगाव लेवा पंचायत सदस्य सुधीर गंगाधर पाटील, डॉ.बाळू पाटील, अशोक चौधरी, यादवराव बर्‍हाटे, आरती चौधरी, मंगला पाटील, स्वाती भोळे, नीला चौधरी, माजी नगरसेवक पुरुषोत्तम नारखेडे, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे संस्थापक आणि केंद्रीय अध्यक्ष प्रकाशराव पाटील, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे आणि केंद्रीय उपाध्यक्ष राजेश सुधाकर चौधरी, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप भोळे, अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र वाणी आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मेळाव्यासाठी समाजातील भुसावळ, जळगाव, नाशिक, पुणे, मुंबई, गुजरात, औरंगाबाद आदी ठिकाणांवरून असंख्य समाजबांधव उपस्थित होते.

व्यवसाय करणार्‍यांना द्यावे प्राधान्य
आमदार संजय साववकारे म्हणाले की, सर्वच तरुणींनी उच्च पदस्थ नोकरदार वराची अपेक्षा केली आहे मात्र नोकरी करणार्‍या युवकाच्या मागे न धावत व्यवसाय करणार्‍या युवकांना सुद्धा निवडीत प्राधान्य द्यावे. युवकांना ड्रग्जपासून दूर ठेवावे, असे आवाहनही त्यांनी केले. खासदार रक्षा खडसे यांनी शेतकरी सुद्धा चांगले कमावतात आणि शेतकी शिक्षण मुले घेऊन मोठी कमाई करत म्हणून शेतकरी मुलाला सुद्धा प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. या प्रसंगी समाजातील मुला-मुलींची माहिती असलेल्या सुचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक अ‍ॅड.प्रकाश पाटील यांनी तर सूत्रसंचालन व आभार जीवन महाजन यांनी मानले.

मेळावा यशस्वीतेसाठी यांनी घेतले परीश्रम
मेळावा यशस्वीतेसाठी अखिल भारतीय लेवा युवक महासंघाचे शहराध्यक्ष देवेंद्र वाणी, प्रदेश संघटक रुपेश चौधरी, जिल्हाध्यक्ष श्याम भारंबे, कार्याध्यक्ष प्रवीण पाटील, कल्पेश पाटील, राहुल नेमाडे, कोमल चौधरी, ओम वाणी, गणेश चौधरी, ऋतिक फालक, अभिराज वाणी, निलेश राणे, पंकज वाणी, उल्हास पाटील, गिरीश पाटील, मनोज जावळे, गिरीश चौधरी, सुरज चौधरी, पार्थ अंबोले, गिरीश चौधरी, संकल्प वाणी आदींनी परीश्रम घेतले.


कॉपी करू नका.