कोचूर बुद्रुक येथे वीज चोरी करतांना दोघांना पकडले


Two caught stealing electricity at Kochur Budruk यावल : कोचुर बुद्रुक, ता.रावेर येथे राज्य विद्युत वितरण कंपनीच्या वतीने वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यात गावात दोन जण वीज चोरी करतांना आढळल्याने त्यांना चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र दोघांनी वेळेत दंड अदा न केल्याने यावल पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात वीज चोरीचा गुन्हा
कोचुर बुद्रुक, ता.रावेर येथे राज्य विद्युत वितरण कंपनीचे कोचूर कक्षाचे कनिष्ठ अभियंता सचिन गुळवेसह कर्मचार्‍यांनी गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. गावात कैलास भागवत कोळी व विठ्ठल किसन कोळी हे दोघे विज चोरी करतांना आढळल्याने या दोघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार प्रत्येकी सहा हजार 773 रुपये दंड आकारणी करून त्यांना नोटीस देण्यात आली. मात्र दोघांनी वेळेत दंड अदा केला नाही म्हणून या दोघांविरुद्ध कनिष्ठ अभियंता सचिन गुळवे यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !