गॅरेज कामासाठी तीन लाख न आणल्याने भुसावळातील विवाहितेचा छळ

0

भुसावळ  : शहरातील माहेर व म्हसावद येथील सासर असलेल्या विवाहितेने गॅरेज कामासाठी तीन लाख रुपये न आणल्याने सासरच्या मंडळींनी छळ केला. याप्रकरणी पतीसह पाच जणांविरोधात भुसावळ बाजारपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

पाच संशयितांविरोधात गुन्हा दाखल
सीमरन मोहसीन पिंजारी (19, म्हसावद, जि.जळगाव, ह.मु.नवीन ईदगाह, खडका रोड, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, आरोपींनी गॅरेज कामासाठी माहेरून तीन लाख रुपये आणण्याची मागणी केली मात्र मागणी पूर्ण न केल्याने शिविगाळ करून चापटा-बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच गांजपाट करण्यात आला. याप्रकरणी मोहसीन कदीर पिंजारी (27), कदीर बिस्मिल्ला पिंजारी (60), सुलताना कदीर पिंजारी (55), यास्मीन आसीफ पिंजारी (30), मोईन कादीर पिंजारी (सर्व रा.म्हसावद, ता.जळगाव) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

 


कॉपी करू नका.