यावल तालुक्यात शिक्षक मतदार संघातील 30 मतदार अर्ज ठरले अपात्र

यावल : नाशिक विभागीय शिक्षक मतदार संघाकरीता मतदार यादीचे तयार करण्याचे काम पूर्ण करण्यात आले. शिक्षक मतदारांना मतदार नोंदणीचे आवाहन करण्यात आले होते. यात वेळेत 680 शिक्षकांनी आपले मतदारांचे अर्ज सादर केले होते. त्यातील 30 अर्ज हे अपात्र ठरले आहे तर 650 मतदारांची यादी आता मान्यतेसाठी ाज्य निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली आहे.
अंतिम यादी निवडणूक आयोगाकडे
नाशिक विभागीय शिक्षक मतदारसंघाचा मतदार नोंदणीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार सुरू करण्यात आला होता. यावल तहसील कार्यालयात तहसीलदार मोहनमाला नाझीरकर, निवासी नायब तहसीलदार संतोष विनंते, निवडणूक नायब तहसीलदार रशीद तडवी, पराग सरोदे, संदीप शिरसाठ, आनंद तायडे यांच्या वतीने शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. यात तालुक्यातील 680 शिक्षकांनी आपापले अर्ज सादर केले होते. यातील 650 अर्ज हे पात्र ठरले आहे तर 30 मतदार नोंदणी अर्ज हे अपात्र ठरले आहे. सेवेत तीन वर्षे पूर्ण न केलेल्या शिक्षकांचे तसेच विविध कारणांनी काही शिक्षक मतदारांचे अर्ज अपात्र ठेवण्यात आले आहे. यावल तालुक्यातून शिक्षक मतदार संघाकरीता 650 मतदार निश्चित करण्यात आले. ही मतदार यादी राज्य निवडणूक आयोगाकडे अंतिम मान्यतेसाठी पाठवण्यात आली आहे.







