यावल शहरातील विरार नगरातील 26 वर्षीय विवाहितेचा एक लाखांसाठी छळ

A 26-year-old married woman from Virar Nagar in Yaval city was harassed for one lakh यावल : शहरातील विस्तारीत भागातील विरार नगरातील माहेर असलेल्या 26 वर्षीय विवाहितेचा घर बांधण्यासाठी माहेेरहून एक लाख रुपये आणावे याकरीता पतीसह सात जणांनी छळ केला. याप्रकरणी यावल पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सात जणांविरोधात गुन्हा
यावल शहरात विस्तारीत भागातील विरार नगरातील माहेर असलेल्या शबनम रमजान तडवी (26) या विवाहितेने यावल पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा विवाह मार्च 2018 मध्ये रमजान हुसेन तडवी (बोरखेडा, हल्ली मुक्काम हरी ओम नगर, यावल) यांच्यासोबत झाला होता. लग्नानंतर विवाहितेचा पती रमजान तडवी, आबेदा तडवी, हुसेन तडवी, नजीर तडवी, मीना तडवी, सायबु तडवी, शमशाद तडवी या सात जणांनी घर बांधण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणावे, व पैसे आणले नाही तर तुला नांदवणार नाही, असे सांगत तिचा छळ केला आणि माहेरी सोडून दिले. याप्रकरणी यावल पोलिसात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.







