किरकोळ वादातून कुर्हेपानाचेत विवाहितेला मारहाण : चौघांविरोधात गुन्हा
A married man was assaulted in Kurhepanach due to a minor dispute: a case against four भुसावळ : किरकोळ वादातून कुर्हेपानाचे येथे विवाहितेला मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चौघांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चौघांविरोधात गुन्हा दाखल
प्रियंका संजय पारधी (27, कोळीवाडा, कुर्हेपानाचे) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, 19 रोजी दुपारी दिड वाजता संशयितांनी दुखापत करण्याच्या उद्देशाने शिविगाळ करीत चापटाबुक्क्यांनी काठीने मारहाण केली. याप्रकरणी संजय संतोष पारधी, पुष्पा ईश्वर पारधी, सोनी गोपाळ पारधी, सागर कडू पारधी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार युनूस मुसा शेख करीत आहेत.


