भुसावळात पुन्हा धाडसी घरफोडी : दीड लाखांचा मुद्देमाल लंपास
Daring burglary again in Bhusawal : One and a half lakh worth of goods looted
भुसावळ : भुसावळ शहरातील वाणी मंगल कार्यालय परीसरातील एका तरुणाच्या बंद घराचे कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 49 हजारांचा मुद्देमाल लांबवला. ही घटना मंगळवार, 21 नोव्हेंबर रोजी सकाळी 6.20 वाजता उघडकीला आली. याप्रकरणी रात्री 10 वाजता भुसावळ शहर पोलिसात ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाढत्या चोर्यांमुळे नागरीक भयभीत
प्रफुल्ल हरीष इंगोले (39 वाणी मंगल कार्यालयाजवळ, भुसावळ) हा तरुण आपल्या परीवारासह वास्तव्याला असून खाजगी नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतो. सोमवार, 20 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 ते 21 नोव्हेंबर सकाळी 6 वाजून 20 मिनिटांच्या दरम्यान त्याचे घर बंद होते. दरम्यान अज्ञात चोरट्यांनी बंद घर असल्याचा फायदा घेत घराचा दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून आत प्रवेश केला. बेडरूममधील कपाटातून सोन्याचे व चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा एकूण एक लाख 49 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार उघडकीला आल्यानंतर प्रफुल्ल इंगोले यांनी भुसावळ शहर पोलिसात तक्रार दिली. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक निलेश गायकवाड करीत आहे.


