कर्जोद येथील शेतकर्‍याचा बोकड लांबवला


रावेर : रावेर तालुक्यातील कर्जोद येथील शेतकर्‍याच्या गावठाण जागेतून चोरट्यांनी सहा हजार रुपये किंमतीचा बोकड लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे.

याप्रकरणी अज्ञाताविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. गणेश मनोहर सावळे (24, कर्जोद) या शेतकर्‍याच्या तक्रारीनुसार, कर्जोद गावातील गावठाण शिवारात गुरे व बकर्‍या बांधल्या असता त्यातील सहा हजार रुपये किंमतीचा व सात महिने वयाचा बोकड चोरट्यांनी लांबवला. तपास हवालदार नितीन डांबरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !