अंजाळेतील कंपनीतून 47 हजारांचे पाईप लांबवले : यावल पोलिसात गुन्हा दाखल


Pipes worth 47,000 were extended from a company in Anjale : A case has been registered in Yaval police यावल : यावल तालुक्यातील अंजाळे गावाजवळील तापी प्रेसिड प्राइड लिमिटेड या कंपनीच्या आवारातून पज्ञात चोरट्यांनी पाईप चोरी केले. तब्बल 46 हजार 500 रुपये किंमतीचे पाईप लांबवण्यात आले. हा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल
अंजाळे, ता.यावल येथील शेत गट क्रमांक 537 दोनमध्ये तापी नदीकाठी तापी प्रेसिडर्स प्रॉडक्ट लिमिटेड कंपनीचे गोडाऊन आहे. या गोडाऊनच्या आवारात ठेवलेले पीव्हीसी पाईप कुणीतरी अज्ञात चोरट्याने चोरी केले. या पाईपांची किंमत 46 हजार 500 रुपये आहे.



याप्रकरणी यावल पोलिसात कंपनीचे व्यवस्थापक जयंत फकीरचंद कोठारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !