कुंभारखेडा माध्यमिक शाळेतून 50 हजारांचा पोषण आहार लांबवला


50,000 nutrition from Kumbharkheda Secondary School extended रावेर : रावेर तालुक्यातील कुंभारखेडा गावातील माध्यमिक जिल्हा परीषद शाळेतून चोरट्यांनी 50 हजार रुपये किंमतीचा पोषण आहार लांबवल्याचा प्रकार समोर आल्यानंतर खळबळ उडाली आहे. याप्रकरणी सावदा पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

शाळेचे कुलूप तोडून लांबवला मुद्देमाल
शिक्षक दिनकर गोविंदा झामरे (चिनावल) यांच्या तक्रारीनुसार, कुंभारखेडा गावापासून एक किलोमीटर अंतरावर जनता शिक्षण समिती संचलित माध्यमिक विद्यालय आहे. 21 ते 22 दरम्यान शाळेला कुलूप असल्याची संधी चोरट्यांनी साधत कुलूप तोडून शाळेत प्रवेश केला. 20 हजार रुपये किंमतीचे तांदूळ, मुगदाळ, मसूर, मटकी, वटाणा, हरबरा, मसाला, मीठ, हळद, जिरे, तेल व मिरची तसेच 15 हजार रुपये किंमतीचे जुने मॉनिटर, दहा हजार रुपये किंमतीचे प्रिंटर, दोन हजार रुपये किंमतीची गॅस शेगडी, तीन हजार रुपये किंमतीचा पाण्याचा पंप असा एकूण 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल लांबवण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !