भीषण अपघातात नाशिकमधील पाच तरुण ठार
Five youths in Nashik were killed in a horrific accident मनमाड : धार्मिक कार्यक्रम आटोपून नाशिक शहराकडे येणार्या तरुणांच्या वाहनाला झालेल्या भीषण अपघातात पाच तरुण ठार झाल्याची घटना मनमाड जवळील अनकवाडे रेल्वे उड्डाण पुलावर घडली. पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार,
कंटेनर-स्विफ्ट कारमध्ये धडक झाली. मनमाडजवळच्या कुंदलगाव येथील म्हसोबा देवस्थान येथे धार्मिक कार्यक्रमासाठी तरुण स्वीप्टने आले होते मात्र परतीच्या प्रवासात त्यांच्यावर कु्रर काळाने घाला घातला


जागीच पाचही तरुणांचा मृत्यू
कंटेनर व स्वीप्टमध्ये झालेल्या धडकेने रोहित धनवटे, श्रेयस धनवटे ,ललित सोनवणे, गणेश सोनवणे, प्रतीक नाईक यांचा मृत्यू झाला. कंटेनरची धडक इतकी जोरदार होती या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला. मृतदेह मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. अवकाळी व पाऊस व रात्रीच्या अंधारामुळे मदतकार्य राबविण्यास अडथळा येत होता. रस्त्याच्या मधोमध हा अपघात झाल्याने या मार्गावरची वाहतूक संथ गतीने सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.
