वरणगावात दोन गटात हाणामारी : सहा जण जखमी ; परस्पर विरोधी गुन्हे दाखल


Clash between two groups in Warangaon: Six injured; Opposing crimes filed भुसावळ : भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथे शनिवारी सायंकाळी सात वाजता किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी झाली तर त्यात सहा जण जखमी झाले.

परस्परविरोधी तक्रार
पहिली फिर्याद शेख नजर शेख मज्जिद (23, विकास कॉलनी) यांनी दिली. संशयित आरोपी दानिश अली, मुजाहिद अली, जाकीब अली कमर अली, जुबेर अली, मजहर रहिम शेख, मझहर तय्यब अली, ऐसान डॉक्टर, इरफान अली, नजीर अली, फिरोज शेख जाकीर अली, जुनेद (सर्व राहणार गौशिया नगर) यांनी विकास कॉलनीत घराच्या घराजवळ येऊन लोखंडी रोड व लाकडी दांड्याने मारहाण केली. या महाराणीत मजर, फरहान शेख व मुक्तार हे जखमी झाले.असून त्यांच्यावर जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत.



दुसर्‍या गटाचीही तक्रार
दुसरी फिर्याद जुबेर अली जाकीर अली यांनी दाखल केली. अरबाज सय्यद जाकीर सैय्यद उर्फ पहेलवान, अज्जू शेख मजीद, समीर शेख मजीद उर्फ टेलर, मजहर शेख मजीद, फैजान शेख समीर, मुजाहिद सय्यद साबीर सैयय्द उर्फ मज्जू, साहिल सय्यद सईद सैय्यद उर्फ पैलवान, शाहीर सय्यद शाबीर सैय्यद, मुक्तार शेख बशीर, ताबीज सय्यद सईद सैय्यद, शोएब अगड्य (सर्व राहणार वरणगाव) यांनी चाकू, फायटर, लोखंडी रॉड, विटा, दगड यांनी मारहाण केल्याने जुबेर व अकीब अली कमर अली जखमी झाले. त्यांच्यावर जळगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक आशिश अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाखाली पोलिस उपनिरीक्षक परशुराम दळवी, पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील, हवालदार नागेंद्र तायडे करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !