मुक्ताईनगरात 18 लाखांचा गुटखा जप्त : एकाला अटक


Gutkha worth 18 lakh seized in Muktainagar : One arrested मुक्ताईनगर : महाराष्ट्रात प्रतिबंधीत असलेला तंबाखूजन्य पदार्थाची वाहतूक होत असल्याची माहिती मुक्ताईनगर पोलिसांनी मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचत कर्की नाक्यावर बोलेरो वाहन अडवत त्यातून सुमारे 18 लाखांचा गुटखा जप्त केला. याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली असून मुक्ताईनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

गोपनीय माहितीवरून
मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांना गुटखा तस्करीबाबत माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे निर्देश दिले. मुक्ताईनगर-बर्‍हाणपूर रस्त्यावरील कर्की नाक्याजवळ सोमवार, 27 रोजी 9.5 वाजेच्या सुमारास बोलेरो (बोलेरो एम.एच.19 सी.वाय.5338) आल्यानंतर तिची झडती घेतली असता त्यात मोठ्या प्रमाणावर पानमसाला आढळल्याने वाहन जप्त करून पोलिस ठाण्यात आणण्यात आले. वाहनातून तीन लाख 96 हजारांचा किंग केशरयुक्त विमल पानमसाला, 11 लाख 22 हजारांचा केसरयुक्त विमल पानमसाला, 44 हजारांची किंग तंम्बाखू तसेच एक लाख 98 हजार रुपये किंमतीचे तंबाखू व पाच लाख रुपये किंमतीचे महिंद्रा बोलेरो वाहन असा एकूण 22 लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. राहुल ताराचंद बेहेनवाल यांच्या फिर्यादीवरून प्रेमचंद हरीराम पंजवानी (रा.सिंधी कॉलनी चोपडा रोड, अमळनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली. तपास पोलिस उपनिरीक्षक राहुल बोरकर करत आहेत.



 


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !