फैजपूरनगरी भजनी मंडळांच्या नगर प्रदक्षिणेने दुमदुमली


फैजपूर : शहरातील विठ्ठल मंदिर, गावातील श्रीराम मंदिर, शिव कॉलनी, विठ्ठल मंदिर, त्रिवेणी मंदिर, सतपंथ मंदिर, आठवडे बाजार, श्रीराम मंदिर येथे कार्तिक स्नान निमित्ताने महिनाभरापासून दररोज सकाळी काकड आरती उत्सव होत होता. या उत्सवाची सांगता नुकतीच उत्साहात झाली. सर्व मंदिरातील भजनी मंडळांनी फैजपूर गावातून दिंडी नगर प्रदक्षिणा काढली. महिला भजनी मंडळाने सहभागी घेतला.

ज्ञानोाबा, तुाकारामाचा गजर
ज्ञानोबा तुकाराम नामघोषाने अवघे फैजपूर शहर दुमदुमले. दिंडीमध्ये श्रीराम मंदिर अध्यक्ष तथा विद्यापीठ सिनेट सदस्य नरेंद्र नारखेडे, सचिव काशीनाथ वारके, विश्वस्त किशोर कोल्हे, दिलीप पाटील, विठ्ठल मंदिर अध्यक्ष राजेंद्र भंगाळे, नरेंद्र महाजन, काकडाचे नेतृत्व करणारे किशोर तांबट व लक्ष्मण पाचपांडे यांचा सुनील नारखेडे यांनी शाल-श्रीफळ देऊन सत्कार केला. भूषण नारखेडे, मयूर नारखेडे व भजनी महिला मंडळाचे डिगंबर महाराज चिनावलकर संप्रदायाचे अध्यक्ष वारकरी नरेंद्र नारखेडे यांनी विशेष अभिनंदन केले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते मनोज सराफ यांचा हभप भावेश महाराज यांच्याहस्ते सन्मान करण्यात आला. गावातील श्रीराम मंदिरात हभप भावेश महाराज सूर्यवंशी विटनेरकर यांचे कीर्तन झाले.







कीर्तनास भानुदास महाराज पाटील, सचिन महाराज, अरुण महाराज परगावकर यांनी सहकार्य केले. आभार अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी मानले. विश्वस्त हेमराज चौधरी, विकास नेमाडे, किरण चौधरी, चंद्रशेखर चौधरी, काशिनाथ वारके, किशोर कोल्हे, दिलीप पाटील, बाबाजी पाटील, मनोज सराफ, बाळू टोके, वासुदेव भिरुड, संचालक राजेश महाजन, पप्पू चौधरी, अमोल बक्षे, मयूर नारखेडे, गणेश पाटील, राहुल साळी, राजाराम महाजन, डॉ.गणेश भारंबे, डॉ.उमेश चौधरी, डॉ.प्रभाकर बारी, पराग चौधरी, शेखर चौधरी, ललित नारखेडे, भूषण चौधरी, जितेंद्र भारंबे, मनोज चौधरी, हेमा कोल्हे, यांनी परीश्रम घेतले. पुरोहित दीपक पाठक, मिलिंद पाठक यांनी मार्गदर्शन केले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !