भुसावळ सत्र न्यायालयाबाहेरील अतिक्रमित टपर्या हटवल्या
Encroached posts outside Bhusawal Sessions Court removed भुसावळ : भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाबाहेरील अतिक्रमण काही दिवसांपूर्वीच पालिकेने हटवून हा परीसर मोकळा केला होता मात्र न्यायालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर वकिलांनी कार्यालयाकरीता चार पत्र्याच्या शेडमध्ये टपर्या थाटल्यानंतर न्यायाधीशांनी हा प्रकार पाहतात तातडीने पालिका प्रशासनाला सूचना केल्या व पालिका प्रशासनातर्फे गुरुवारी कार्यालय स्वरूप असलेल्या टपर्या हटवल्या.
टपर्या थाटणार्यांनी काढले अतिक्रमण
भुसावळ सत्र न्यायालयातील न्यायाधीशांचे आदेश येतात पालिकेचे उपमुख्य अधिकारी लोकेश ढाके, उपमुख्याधकारी परवेज शेख, बांधकाम अभियंता नंदकिशोर असटकर याच्यासह कर्मचारी यांनी जेसीबी घेऊन न्यायालय परीसर गाठला मात्र ज्यांनी येथे ऑफिससाठी टपर्या काही दिवसापूर्वी थाटल्या होत्या त्यांनी ते स्वतः त्या हटवल्या व होणारे नुकसान टळले. दरम्यान, पालिकेचे पथक न्यायालय आवाराच्या परीसरात धडकताच शहरात अतिक्रमण करणार्या टपरीधारकांनी आपापल्या पद्धतीने लावण्यात आलेला टपर्यांची व लोटगाड्या हलवण्यास सुरूवात केल्याने काही वेळ अतिक्रमण धारकांमध्ये अस्वस्थता पसरली होती.


