वैद्यकिय प्रमाणपत्रासाठी सफाई कर्मचार्यांना आता जळगावचा दाखला ग्राह्य
भुसावळ मुख्याधिकार्यांचे आश्वासन : सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खरारे यांच्या पाठपुराव्याला यश
Jalgaon application is now required for sanitation workers for medical certificate भुसावळ : नगरपालिका सफाई कर्मचार्यांना वैद्यकिय रजेसाठी किंवा वैद्यकिय रजेनंतर सेवेत रुजू होण्यासाठी धुळे येथील वैद्यकिय महाविद्यालयातून डॉक्टरांचे प्रमाणपत्र आणावे लागत होते मात्र शासकिय अद्यादेशाप्रमाणे जळगाव जिल्हा रुग्णालयातील पत्र ग्राह्य धरावे या मागणीसाठी भाजपचे पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते अर्जुन खरारे यांनी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना निवेदन देवून चर्चा केली. मुख्याधिकार्यांनी तत्काळ या मागणीला सहमती दर्शवत याबाबत परिपत्रक काढण्याचे आश्वासन दिले.
चर्चेअंती मागणी झाली मान्य
नगरपरीषद सफाई कर्मचारी यांचे अपघात झाल्यास किंवा आजारी असल्यास कायद्याने फिट, अनफिट वैद्यकिय प्रमाणपत्रासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय जाऊन दाखला घेणे अनिवार्य आहे परंतु भुसावळ नगरपरीषदेत गेल्या पाच वर्षांपासून धुळे वैद्यकिय महाविद्यालयाचा दाखला अनिवार्य करण्यात आला. या करणी शासन निर्णयानुसार जळगाव जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयाचा दाखला ग्राह्य धरावा या मागणीसाठी अर्जुन खरारे यांनी मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांना निवेदन देवून चर्चा केली. शासकीय नियमानुसार जळगाव जिल्हा रुग्णालयाचा दाखला ग्राह्य धरला जाईल, यासोबत याबाबतचे परीरपत्रक काढणार असल्याचे मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सांगितले. मागणी मान्य झाल्याने खरारे यांनी मुख्याधिकारी वाघमोडे यांचे आभार मानले.






स्वेच्छानिवृत्तीसाठी 15 वर्षांचा नवीन नियम
नगरपरीषद सफाई कर्मचार्यांना स्व:च्छेने सेवानिवृत्तीसाठी यापूर्वी किमान 20 वर्ष सेवा आवश्यक होती मात्र आता नवीन निर्णयानुसार ही सेवा पाच वर्ष कमी करुन 15 वर्षांवर करण्यात आली आहे. या नियमांचीही अंमलबजावणी करावी, अशी मागणी अर्जुन खरारे यांनी केली. या निर्णयावरही मुख्याधिकारी वाघमोडे यांनी नियमांनुसार यापुढील काळात सेवानिवृत्तीचा कालखंड पंधरा वर्षाचा असेल स्पष्ट केले. याबाबतही परीपत्रक काढण्याचे आश्वासन दिले.


