रावेर तहसीलमधील सेवानिवृत्त शिपायाचा रेल्वेतून पडून मृत्यू


Retired constable dies after falling from train in Raver tehsil रावेर : रावेर तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त कर्मचारी रतन भालेराव यांचा धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. याबाबत रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

तहसील कार्यालयातील कर्मचार्‍यांमध्ये शोककळा
रावेर तहसील कार्यालयातील सेवानिवृत्त शिपाई रतन राजाराम भालेराव (63, जी.आय.कॉलनी, रावेर) यांचा येथील रेल्वे स्टेशनजवळ काही अंतरावर रावेरकडून भुसावळकडे जाणार्‍या धावत्या रेल्वेतून पडून मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी ही घटना घडली. या घटनेची बातमी शहरात वार्‍याच्या वेगाने पसरताच नागरीकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. मनमिळावू असलेल्या भालेराव यांनी तहसील कार्यालयात काम करताना सर्वांशी प्रेमाचे संबंध निर्माण केले होते. अनेकांना या घटनेने धक्का बसला आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मनोज भालेराव यांनी खबर दिल्यानंतर रावेर पोलिसात स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास हवालदार अर्जुन सोनवणे पुढील तपास करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !