भुसावळातील दे.ना.भोळे महाविद्यालयात स्व.बहिणाबाई चौधरी यांना पुण्यतिथीनिमित्त अभिवादन


Greetings to Mrs. Bahinabai Chaudhary on her death anniversary at De.N.Bhole College in Bhusawal भुसावळ : शहरातील दादासाहेब देविदास नामदेव भोळे महाविद्यालयात रविवार, 3 डिसेंबर 2023 रोजी लेवागणबोली उपासक स्व.बहिणाबाई चौधरी यांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ.आर.पी.फालक यांनी माल्यार्पण केले. त्याप्रसंगी त्यांच्या कवितेचे वाचन करण्यात आले.

यांची कार्यक्रमास उपस्थिती
प्रास्ताविक राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.आर.बी.ढाके यांनी केले. राष्ट्रीय सेवा योजनेचे सहाय्यक कार्यक्रमाधिकारी डॉ.जगदीश चव्हाण, महिला कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.माधुरी पाटील, विद्यार्थी विकास अधिकारी प्रा.आर.डी.भोळे, प्रा.डॉ.अनिल सावळे, प्रा.संगीता धर्माधिकारी, प्रा.तबरेज खान, दीपक महाजन, विजय पाटील तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे विभागाचे विद्यार्थी उपस्थित असल्याचे प्रसिद्धी प्रमुख डॉ.संजय चौधरी कळवतात.


कॉपी करू नका.