सालबर्डीत एकाचवेळी दोन घरे फोडली : दिड लाखांचा ऐवज लंपास
Two houses were broken into at the same time in Salbardi : Lumpas instead of half a lakh मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील सालबर्डी येथे एकाचवेळी दोन बंद घरांना टार्गेट करीत चोरट्यांनी रोकडसह व दागिण्यांसह एक लाख 57 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास केला. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. शहरी भागानंतर चोरटे आता ग्रामीण भागाकडे वळल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली आहे
बंद घरांना केले टार्गेट
तक्रारदार गणेश अनिल झोपे (28, सालबर्डी) व राजेंद्र सोपान बर्हाटे (सालबर्डी) यांच्या तक्रारीनुसार, 3 रोजी रात्री 10 ते 4 रोजीच्या पहाटे पाच दरम्यान चोरट्यांनी बंद घराचे कुलूप कापत चोर्या केल्या. झोपे यांच्या बंद घरातून 50 हजार रुपये किंमतीची व 10 ग्रॅम वजनाची सोन्याची गहू पोत, 25 हजार रुपये किंमतीचे कानातले, 12 हजार 500 रुपये किंमतीचे मंगळसूत्र, 35 हजारांची रोकड तसेच बर्हाटे यांच्या घरातील कापसाच्या गंजीमागील कपाटातून 35 हजारांची रोकड मिळून एक लाख 57 हजार 500 रुपयांचा ऐवज लंपास करण्यात आला. प्रभारी पोलिस उपअधीक्षक कुणाल सोनवणे, मुक्ताईनगर पोलिस निरीक्षक नागेश मोहिते यांनी भेट देत पाहणी केली.


