अट्टल चोरटा एमआयडीसी पोलिसांच्या जाळ्यात : चोरीच्या चार दुचाकी जप्त
Attal thief in MIDC police net: Four stolen bikes seized जळगाव : अट्टल दुचाकी चोरट्याला एमआयडीसी पोलिसांनी अटक करीत त्याच्याकडून चार दुचाकी जप्त केल्या. प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे (सुप्रीम कॉलनी, जळगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
सिंधी कॉलनी परीसरातील सिद्धार्थ लुल्ला यांची दुचाकी 25 ऑक्टोबर रोजी दुर्गा विसर्जनच्या दिवशी तलाव परिसरातून चोरी झाली होती. एमआयडीसी पोलिस या गुन्ह्याचा तपास करीत असताना सुप्रीम कॉलनी परिसरामध्ये संशयित आरोपी हा चोरीची दुचाकी घेऊन फिरत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. पथकाने सुप्रीम कॉलनीमध्ये सापळा रचून संशयित आरोपी प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडित साबळे याला अटक केली. त्याच्याकडील चोरीची दुचाकी जप्त केल्यानंतर त्याने चौकशीत अन्य चोरीच्या चार दुचाकी काढून दिल्या. पोलिसांनी चारही दुचाकी ताब्यात घेऊन संशयित आरोपीच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. संशयित आरोपीला न्यायालयात हजर केले असता त्याला पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

यांनी आवळलया मुसक्या
ही कारवाई एमआयडीसी पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, सहायक फौजदार अतुल वंजारी, पोलिस हेड कॉन्स्टेबल अल्ताफ पठाण, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, सचिन पाटील, विकास सातदिवे, छगन तायडे आणि ललित नारखेडे आदींच्या पथकाने केली.
