रावेर शहरात उद्यापासून रंगपंचमी व्याख्यानमाला
रावेर :शहर व परीसराची सांस्कृतिक ओळख असलेली रंगपंचमी व्याख्यानमाला बुधवार, 6 ते 10 डिसेंबर दरम्यान होणार आहे. यावर्षीही महाराष्ट्रातील दर्जेदार आणि नामांकित वक्त्यांच्या विचारांची मेजवानी श्रोत्यांना मिळणार आहे.
हिवाळीत मिळणार श्रोत्यांना ज्ञानाची ऊब
पहिले पुष्प बुधवार, 6 डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता महामंडलेश्वर श्री जनार्दन हरीजी महाराज ‘संस्कारशील युवकांची पिढी-राष्ट्राची गरज’ या विषयावर गुंफतील. दुसरे गुरुवार, 7 रोजी सायंकाळी 6.15 वाजता संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचे अकरावे वंशज हभप शिरीष महाराज मोरे (देहू गाव) हे ‘छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकाचे महत्त्व’ या विषयावर तर तिसरे पुष्प शुक्रवार, 8 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाता ज्ञानेश्वर शेंडे (जळगाव) ‘आई-वडील होणे सोपे ; पालक होणे कठीण’ या विषयावर गुंफतील. चौथे पुष्प शनिवार, 9 डिसेंबर रोजी सायंकाळी 6.15 वाजता कॅप्टन संदीप रायभोळे (नागपूर) हे ‘ नौदल व अन्य स्पर्धा परीक्षांची तयारी’ या विषयावर तर पाचवे पुष्प रविवार, 10 डिसेंबर रोजी सायं 6.15 वाजता सौरव आठवले (नगाव) हे ‘सफर अवकाशाची. (श्रोत्यांना दुर्बिणीतून ग्रह, तार्यांचे दर्शन) या विषयावर गुंफतील. व्याख्यान मालेसाठी भवरलाल आणि कांताबाई जैन फाउंडेशन, जळगाव, हरेश तोलानी आणि मोतीराम खटवाणी यांचे सहकार्य लाभले आहे. सर्वच व्याख्याने रावेरातील सौ.के.एस.ए.गर्ल्स हायस्कूलमध्ये होतील. श्रोत्यांना प्रवेश विनामूल्य असून उपस्थितीचे आवाहन विश्वस्त डॉ.राजेंद्र आठवले, दिलीप वैद्य, अध्यक्ष विठोबा पाटील, सचिव प्रा.व्ही.व्ही.पाटील व सर्व सदस्यांनी केले आहे.








