हतनूर येथील 23 वर्षीय विवाहितेचा विनयभंग : दोघांविरोधात गुन्हा


Rape of 23-year-old married woman in Hatnoor : Crime against both भुसावळ : भुसावळ तालुक्यातील हतनूर येथील 23 वर्षीय विवाहितेला अश्लील इशारे करीत तुमच्यासोबत संबंध ठेवू द्या नाही तर तुमच्या नवर्‍याला मारून टाकू, अशी धमकी देणार्‍या दोघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

तर पतीला ठार मारू…
23 वर्षीय पीडीतेच्या तक्रारीनुसार, संशयित आरोपी तुषार अरुण तायडे व अनिल प्रकाश पाटील यांनी पीडीतेच्या घराभोवती सातत्याने चकरा मारल्या तसेच तुमच्यासोबत संबंध ठेवू द्या अन्यथा तुमच्या पतीला आम्ही ठार मारू, अशी धमकी दिली. पीडीतेने वरणगाव पोलिसात धाव घेत तक्रार दिल्यावरून दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक किशोर पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !