यावल न्यायालयात उद्या राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन
National Lok Adalat will be organized tomorrow at Yaval Court यावल : यावल न्यायालयात शनिवार, 9 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यात दिवाणी, फौजदारी, वित्तीय संस्थासह दाखल होण्यापूर्वीचे तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या थकबाकीदारांची प्रकरण ठेवली जाणार आहे. या लोकअदालतीचा लाभ घ्यावा, असे आवाहन न्यायालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
लाभ घेण्याचे आवाहन
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधीकरण, मुंबई तसेच जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जळगाव यांच्या आदेशान्वये व यावल येथील न्यायालयात शनिवारी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. यावल तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश एस.बी.वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली पॅनल प्रमुख सह.दिवाणी न्या.व्ही.एस.डामरे यांच्या उपस्थितीत होणार्या या राष्ट्रीय लोकअदालतीत विविध प्रलंबीत दाव्यांसह बँकेची तसेच इतर वित्तीय संस्था व यावल तालुक्यातील ग्रामपंचायर्तीचे, बी.एस.एन.एल.विद्युत वितरण कंपनी आदींच्या दाखलपूर्व प्रकरणांवर निपटारा केला जाणार आहे. न्यायालयातील प्रलंबित विवाह वाद, दिवाणी, फौजदारी प्रकरणे तडजोडीसाठी मोठ्या प्रमाणावर ठेवण्यात आले आहेत. लोक न्यायालयात उपस्थित राहुन मोठ्या प्रमाणावर वाद विवाद संपवावेत, असे आवाहन तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष न्यायधिश एस.बी.वाळके यांनी पक्षकारांना केलेले आहे.


