खडका रोडवरील घरासमोरून दुचाकी लांबवली
A bike was parked in front of a house on Khadka Road भुसावळ : शहरात दुचाकी चोरींचे सत्र कायम आहे. खडका रोडवरील सत्यसाईनगरातून चोरट्यांनी 15 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
मोहमद अझर जफर शेख यांच्या फिर्यादीनुसार त्यांनी दुचाकी (एम.एच.19 सी.एस.6397) ही घराबाहेर लावली असता चोरट्यांनी 10 ते 11 डिसेंबरदरम्यान संधी साधली. शोध घेवूनही दुचाकी न सापडल्याने त्यांनी भुसावळ तालुका पोलिसात तक्रार दिल्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रेमचंद सपकाळे करीत आहेत.


