फैजपूर शहराच्या प्रांताधिकारीपदी आयएएस देवयानी : पदभार स्वीकारला


IAS Devyani as Provincial Officer of Faizpur City: Assumed charge फैजपूर : फैजपूर प्रांताधिकारी कैलास कडलग यांची बदली झाल्यानंतर रीक्त जागी आयएएस अधिकारी देवयानी यांची बदली करण्यात आली असून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली आहेत. युपीएएसी परीक्षेत यश संपादन केल्यानंतर त्यांनी मसुरी येथून प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर त्यांची फैजपूर येथे बदली करण्यात आली. सहायक जिल्हाधिकारी पद मिळाले असून त्या प्रांताधिकारी म्हणून काम करणार आहेत.

फैजपूरला महिला प्रांताधिकारी
देवयानी या हरियाणातील महेंद्रगड येथील मूळ निवासी असून त्यांनी बिटस पीलानी संस्थेच्या गोवा येथील कॉलेजमधून इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड इन्स्ट्रुमेंटेशन या विषयात अभियांत्रीकीची पदवी संपादन केली आहे. 2021 सालच्या युपीएएसी परीक्षेत त्यांनी देशातून अकराव्या क्रमांकाने रँक मिळवत यश संपादन केले होते. यानंतर मसुरी येथील आयएएस अकॅडमीतून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांना ऐतिहासिक फैजपूर शहरात नियुक्ती मिळाली आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !