अमरावती-पुणे एक्सप्रेसला स्लीपरसह एसी थ्री टायर डबा


भुसावळ  : प्रवाशांच्या सोयीसाठी अमरावती-पुणे हुतात्मा एक्स्प्रेसला रेल्वे प्रशासनाकडून एक स्लीपर कोच व एक एसी थ्री इकॉनॉमी डबा शनिवार, 16 डिसेंबरपासून जोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे प्रशासनकडून प्रवाशांच्या सोयीसाठी अमरावती पुणे आणि अमरावती-अजनी एक्सप्रेस या गाड्यांच्या संरचनेत बदल करण्यात आला आहे.

रेल्वे प्रवाशांची झाली सोय
या गाड्यांना आता वाढीव एक स्लीपर आणि एक एसी थ्री टायर इकॉनॉमी डबा (कोच) जोडण्यात येणार आहे. सुधारीत रचनेत या गाडीला जनरेटर डबा, स्लीपर कोच दोन, एसी चेअर कार एक, नॉन एसी चेअर कार- 10, एसी थ्री टायर इकॉनॉमी एक, आणि गार्ड ब्रेक यान दोन असे 16 एलएचबी कोच असतील. गाडी क्रमांक 11026 पुणे-अमरावती एक्सप्रेसला शनिवारपासून तर गाडी क्रमांक 11025 अमरावती -पुणे एक्सप्रेसला शुक्रवारपासून हे डबे जोडले जाणार आहे. गाडी क्रमांक 12119 अमरावती-अजनी एक्सप्रेसला 16 डिसेंबरपासून तर गाडी क्रमांक 12120 अजनी -अमरावती एक्सप्रेसला 16 शनिवारपासून हे डबे जोडले जातील. प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून केले आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !