भुसावळात महिलेचा विनयभंग करीत पतीसह मुलाला मारहाण : दोघांविरोधात गुन्हा


Bhusawal molested woman and beat her husband and child : Crime against both भुसावळ  : गाडी पार्किंग लावण्याच्या वादातून शहरातील शारदा नगरातील 43 वर्षीय महिलेचा विनयभंग करत पतीसह मुलाला शिवीगाळ करीत मारहाण करण्यात आली. ही घटना मंगळवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता घडली आहे. याप्रकरणी रात्री 10 वाजता भुसावळ शहर पोलिसात भरत बेंडाळे व विशाल बेंडाळे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

दोघांविरोधात गुन्हा दाखल
भुसावळ शहरातील शारदा नगरात 43 वर्षीय महिला आपल्या पती आणि मुलासह वास्तव्याला आहे. बुधवार, 13 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता गाडी पार्क करण्याच्या कारणावरून याच परीसरातील भरत बेंडाळे आणि विशाल बेंडाळे यांनी महिलेचे पती आणि त्यांच्या मुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर महिलेला लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करत त्यांचा विनयभंग केला. हा प्रकार घडल्यानंतर महिलेने कुटूंबासह पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यावरून संशयित आरोपी भरत बेंडाळे आणि विशाल बेंडाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक मोहम्मद अली सैय्यद करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !