जळगावच्या समता नगरात तरुणाचा खून : तिसर्‍या संशयिताला वावडदा गावातून बेड्या


Murder of youth in Jalgaon’s Samata Nagar : Third suspect arrested from Vavadda village जळगाव :पूर्व वैमनस्यातून जळगावच्या समता नगरातील अरुण बळीराम सोनवणे (28) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला होता. या खून प्रकरणी सुरूवातीला दोन संशयिताना अटक करण्यात आल्यानंतर तिसर्‍या संशयिताला वावडदा येथून गुन्हे शाखेने अटक केली आहे. प्रवीण उर्फ दोध्या पिंट्या प्रेमराज शिरसाळे (रा.संभाजी नगर, जळगाव) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे.

यापूर्वी दोन संशयितांना अटक
खून प्रकरणी संशयीत अशोक महादू राठोड यास एमआयडीसी पोलिसांनी मध्य प्रदेशातील नेपानगरातून तर दुसरा संशयित कुलदीप उर्फ सोनू आढळे याला विसरवाडी जवळून जळगाव गुन्हे शाखेने अटक केली होती.

यांनी आवळल्या मुसक्या
जळगाव गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलिस निरीक्षक किसनराव नजन-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेतील उपनिरीक्षक गणेश वाघमारे, एएसआय विजयसिंग पाटील, सुधाकर अंभोरे, महेश महाजन, अकरम शेख, विजय पाटील, किरण धनगर, सचिन महाजन, संदीप सावळे, किरण चौधरी, दर्शन ढाकणे, ईश्वर पाटील, प्रमोद ठाकूर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

अन्य दोन आरोपींचा कसून शोध
पिंट्या हा त्याच्या मूळ गावी नागदुली-म्हसावद येथे आला असून तो तेथून निघून बाहेरगावी निघून जाण्याच्या तयारीत असल्याची माहिती एलसीबीला मिळाली होती. त्यावरून पथकाने शिरसोलीमार्गे वावडदा येथे जावून तिथे सापळा लावला. वावडदा बसस्टॅन्ड जवळील सरपंच चहाच्या टपरीचे आडोश्याला उभा असताना पिंट्याला ताब्यात घेण्यात आले. खून प्रकरणात तीन संशयितांना अटक करण्यात आली असून अद्याप दोघे पसार आहेत.

 


कॉपी करू नका.