किनगाव इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलमध्ये 20 रोजी वधू-वर मेळावा


यावल : यावल तालुक्यातील किनगाव येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलमध्ये बुधवार, 20 रोजी मराठा समाजाच्या वधू-वर परीचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्याचा लाभ समाज बांधवांनी घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

वधू-वरांना उपस्थितीचे आवाहन
किनगाव, ता.यावल येथील इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूलमध्ये बुधवार, 20 रोजी मराठा समाजाचा वधू-वर परीचय मेळावा होत आहे. इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कुलचे चेअरमन व अन्न आणि औषध प्रशासन महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त सहाय्यक आयुक्त विजयकुमार देवचंद पाटील यांच्या संकल्पनेतून या मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाच्या तरुण व तरुणींनी या मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन इंग्लिश मिडीयम निवासी पब्लिक स्कूल व व्ही.मार्ट परीवार यांनी केले आहे.






या मेळाव्यासाठी वधू व वर यांनी आपले परीचय पत्र (बायोडाटा) व स्व.लिखीत अर्जासह उपस्थित रहावे, मेळाव्यात वधू व वर यांनी व्यासपीठावर येऊन आपला संपुर्ण परीचय करून द्यावा व आपसात मेळ करण्याचा प्रयत्न करावा त्यासाठी गरज पडल्यास आयोजकही पुढाकार घेणार आहेत. हा मेळावा पूर्णपणे निशुल्क असून 20 रोजी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळात हा मेळावा घेण्यात येणार आहे. या मेळाव्यात सहभागी होण्यासाठी आपले परीचय पत्र (मोबाईल नंबरसह) व्यंकटेश बालाजी एंटरप्रायजेस संचलित व्ही.मार्ट, किनगाव येथे स्विकारले जातील तसेच मेळाव्यातही आणले तरी चालणार आहे. या मेळाव्यासाठी सकल मराठा समाज यावल तालुक्याचे सहकार्य लाभणार आहे. अधिक माहितीसाठी प्रा.मुकेश येवले, डी.बी.पाटील (यावल), अजय पाटील (सावखेडासीम), सुनील गावडे-पाटील (यावल), महेश पाटील (उंटावद) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !