मोहाडीतील प्रौढाचा दुचाकी अपघातात दुर्दैवी मृत्यू


The unfortunate death of an adult in Mohadi in a two-wheeler accident जळगाव : अजिंठा घाटाजवळ दुचाकीला अपघात झाल्यानंतर मोहाडीतील 55 वर्षीय दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. जितेंद्र गोपाळ तायडे (55, रा.मोहाडी ता.जि.जळगाव) असे मृताचे नाव आहे. हा अपघात सोमवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडला. तायडे हे सासरवाडीहून जळगाव येथे परतत असतांना दुचाकी स्लीप झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली.

मयत पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी
जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील जितेंद्र गोपाळ तायडे हे आपल्या पत्नी, दोन मुलं यांच्यासह वास्तव्याल होते. ते जळगाव महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात वाटरसप्लाय म्हणून कार्यरत होते. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सासरवाडी असल्यामुळे ते दुचाकीने कामानिमित्त भेटीसाठी गेले होते. सोमवारी ते दुचाकीने जळगावकडे परतत असताना सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास अजिंठा घाटानजीक त्यांची दुचाकी स्लिप झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर मोहाडी गावातील नातेवाईकांनी धाव घेतली. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, पवन आणि सनी ही दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.


कॉपी करू नका.