जळगाव एमआयडीसीत कामगाराचा पाण्यात बुडाल्याने मृत्यू


Jalgaon MIDC worker dies due to drowning जळगाव : काम करताना पाण्यात बुडाल्याने कामगाराचा मृत्यू ओढवला. ही घटना जळगाव एमआयडीसी परिसरातील मीनाक्षी कंपनीत सोमवारी सकाळी सात वाजता उघडकीस आली. मआयडीसी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. गणेश वसंत सोनार (29, साई नगर, जळगाव) असे मयत कामगाराचे नाव आहे.

फिट आल्याने पाण्यात पडल्याचा अंदाज
गणेश सोनार हा आई, वडील, दोन भाऊ यांच्यासह वास्तव्याला होता. साधारण एक वर्षांपासून तो जळगाव एमआयडिसीतील ए- सेक्टरमधील मीनाक्षी या कंपनीत कामाला लागला होता. सोमवार, 18 डिसेंबर रोजी सकाळी सात वाजता कंपनीत असताना त्याला अचानक फिट आले व तो पाण्यात पडला, अशी माहिती कामगारांनी दिली. त्याला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी कंपनीतल्या कामगारांनी आणले असता, त्याला वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन पाटील यांनी मयत घोषित केले.


कॉपी करू नका.