खंडव्यातील प्रौढाचा रेल्वेतून तोल जावून पडल्याने मृत्यू


An adult in Khandwa dies after falling off the train रावेर : रेल्वेतून तोल लावून पडल्याने खंडव्यातील 45 वर्षीय प्रौढाचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी घडली. याप्रकरणी रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मोनू बलराम मुंडले (परदेशीपूरा मिन्नत गल्ली, वॉर्ड नंबर 45, खंडवा, मध्यप्रदेश) असे मृताचे नाव आहे.

तोल गेल्याने ओढवला मृत्यू
मोनू मुंडले हा तरुण खंडवा येथून भुसावळकडे कुठल्यातरी रेल्वेने येत असताना दरवाजा उभा असताना त्याचा तोला गेला व खाली पडल्याने डोक्याला जबर मारल्याने त्याचा मृत्यू ओढवला. रावेर-निंभोरा सेक्शन 475/34-35 दरम्यान त्याचा मृतदेह आढळला. तत्पूर्वी 12172 या रेल्वेने त्यास हवालदार खंडागरे यांनी भुसावळ ट्रामा सेंटरमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. भुसावळ लोहमार्गला नोंद करून ती रावेर पोलिसांकडे वर्ग करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !