शेतात शॉक लागून मृत्यू : यावलच्या शेतकर्‍याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा ; पोलिसांनी ठोकल्या बेड्या


Death due to shock in the field: A case of culpable homicide against a farmer of Yaval; The police beat the shackles यावल : शहरालगत असलेल्या शेतात तारांचे कुंपण करून त्यात सोडलेल्या विद्युत प्रवाहामुळे 35 वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी यावल पोलिस ठाण्यात संबधीत शेतकर्‍याविरूध्द सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. शेतकर्‍याला अटक केल्यानंतर त्यास चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

असे आहे प्रकरण
यावल शहरातील शेतकरी प्रशांत मुरलीधर महाजन यांच्या मालकीचे शेत गट क्रमांक 724/2 हे शेती क्षेत्र सचिन रमेश कोळी यांना बटाईने देण्यात आले आहे. दरम्यान शेतकरी सचिन कोळी यांनी आपल्या शेतात हरभरा पीक पेरले असून शेताच्या चारी बाजूला त्यांनी तारेचे कुंपण करून त्यात विद्युत प्रवाह सोडला आहे. या विद्युत तारेचे शॉक लागून विशाल राजू मेढे (35, अडावद ता. चोपडा) या तरुणाचा मृत्यू झाला होता. ही घटना शुक्रवारी उघडकीस आली.



गुन्हा दाखलल होताच शेतकर्‍याला बेड्या
याप्रकरणी यावल पोलिसात अनिल राजू मेढे (चुंचाळे, ता.यावल) यांच्या फिर्यादीवरून शेती बटाईने करणार्‍या शेतकरी सचिन कोळी याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित शेतकरी सचिन कोळी याला पोलिसांनी अटक केली. त्यास शनिवारी यावल येथील सहदिवाणी न्यायाधीश व्ही. एस. डामरे यांच्या न्यायालयात हजर केले असता चार दिवसाची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पुढील तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !