वरखेडे बुद्रुक गावात वीज चोरी : तिघांविरोधात गुन्हा
Electricity theft in Varkhede Budruk village : Case against three यावल : वरखेडे बुद्रुक, ता.बोदवड या गावात राज्य विद्युत वितरण कंपनीकडून वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. गावात तीन जण वीज चोरी करतांना आढळल्याने या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र तिघांनी दंड न भरल्याने तिघांविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दंड न भरल्याने कायदेशीर कारवाई
वरखेडे बुद्रुक, ता.बोदवड येथे बोदवड महावितरण कार्यालयाच्या गुणवत्ता व नियंत्रण कक्षाचे सहायक अभियंता राहुल शिवाजी चौधरीसह पथकाने गावात वीज चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवली. यात गावात त्यांना बाळकृष्ण मुकुंदा चौधरी, तुषार सुनील पाटील व अमोल सोपान कदम हे तीन जण वीज चोरी करतांना आढळून आले. या तिघांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार त्यांना दंड आकारून नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी वेळेत दंड न भरल्याने या तीन जणांविरुद्ध यावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.


