नवी दिल्लीतील भजनपुर्यात एकाच घरात पाच जणांचे मृतदेह आढळले
नवी दिल्ली : नवी दिल्लीमधील भजनपुरा परीसरात असलेल्या एका घरात पाच जणांचे मृतदेह सापडल्याने परीसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेहत. भजनपुरा परीसरातील राहत्या घरात पाच जणांचे मृतदेह आढळले आहेत. या मृतदेहांमध्ये तीन मुलांसह एक महिला आणि पुरूषाचा समावेश आहे. या मृतदेहांची ओळख पटली असून ते एकाच कुटुंबातील आहेत. यातील पुरूष हा रीक्षा चालक असल्याची माहिती आहे.