काबुलमध्ये आत्मघाती स्फोटात 63 जणांचा मृत्यू ; 182 जण जखमी

काबूल : अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये शनिवारी रात्री झालेल्या आत्मघाती बॉम्बस्फोटात 63 जणांचा मृत्यू झाल्याची शक्यता वर्तवली जात असून 182 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, काबूलमधील पश्चिमेकडील दुबई शहरात एका लग्न समारंभादरम्यान हा बॉम्बस्फोट घडवण्यात आला. यावेळी हॉलमध्ये लग्न समारंभासाठी एक हजारहून अधिक लोक उपस्थित होते. अफगानिस्तानच्या गृहमंत्रालयाने सांगितले की, हा आत्मघाती हल्ला शनिवारी रात्री स्थानिक वेळेनुसार साडेदहा वाजताच्या सुमारास झाला. अद्याप या हल्ल्यची जबाबदारी कोणत्याही दहशतवादी संघटनेने घेतली नाही. त्यामुळे या हल्ल्यामागे कोणाचा हात आहे, याबाबत काहीच सांगता येत नाही, असे गृहमंत्रालयाच्या प्रवक्त्या नुसरत रहीमी यांनी सांगितले. हल्लेखोराने लग्न समारंभावेळी जास्त लोक उपस्थित असताना स्फोट घडविला. या स्फोट लग्नाच्या स्टेजजवळ केला, त्याठिकाणी म्युजिशियन उपस्थित होते, असेही नुसरत रहीमी यांनी सांगितले. एका प्रत्यक्षदर्शीने दावा केला आहे की, या बॉम्बस्फोटात अनेक लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.




