दीपनगरातील सीएचपी विभागात चोरी : एकाला अटक
Theft in CHP department in Deepnagar : One arrested भुसावळ : दीपनगर 210 प्रकल्पातील सीएचपी विभागात तब्बल 21 हजार रुपये किंमतीचे भंगार चोरी केल्याप्रकरणी एका आरोपीला भुसावळ तालुका पोलिसांनी अटक केली आहे. अल्पवयीनासह चार संशयितांविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
चोरी करताना संशयिताला अटक
कनिष्ठ सुरक्षा अधिकारी कुणाल लहू वाघोदे (38) यांच्या फिर्यादीनुसार, दीपनगरातील सीएचपी विभागातील 210 मेगावॅट परीसरात संशयित प्रदीप सुरेश कोल्हे, देव ठाकरे (निंभोरा), जितू कोळी (फेकरी) व एका अल्पवयीनाने बुधवार, 27 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास लोखंडाची आसारी, प्लेट व किरकोळ सामान मिळून 21 हजारांचा मुद्देमाल चोरला व त्याचवेळी सुरक्षा रथक तेथे पोहोचल्यानंतर तीन संशयित पसार झाले तर प्रदीप कोल्हे यास ताब्यात घेण्यात आल्यानंतर त्यास भुसावळ तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. तीन सज्ञान व एका अल्पवयीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास हवालदार योगेश पालवे करीत आहेत.


