यावलला 36 वर्षीय तरुणाला मारहाण : 15 जणांविरूध्द दंगलीचा गुन्हा


A 36-year-old youth was beaten up in Yaval : Riot case against 15 people यावल : यावल शहरातील बोरावल गेट परिसरात नातेवाईकाकडे आलेल्या बामणोद येथील 36 वर्षीय तरुणाला दहिगाव तसेच सावखेडासीम येथील सुमारे 15 जणांनी येऊन मारहाण केली. तू राजकीय सोशल मीडियावर सक्रिय राहतो या कारणावरून वाद घालत त्याला शिवीगाळ करून लाठ्या-काठ्यांनी मारहाण करीत जीवे ठार मारण्याची धमकी दिली. यावल पोलिसस ठाण्यात दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

15 संशयितांविरोधात गुन्हा दाखल
यावल शहरातील बोरावल गेट भागातील हितेश गजरे यांच्या घरी त्यांचे नातेवाईक दिवाकर रमेश भालेराव (36, इंदिरानगर, बामणोद) हे आले असता त्यांच्या घरात येऊन रोहन महाजन (दहिगाव), शेखर पाटील (सावखेडासीम) यांच्यासह अज्ञात 15 जण आले व तरूणास सांगू लागले की, तू सातत्याने राजकीय सोशल मीडियावर सक्रिय राहतो. यावरून वाद झाला व सर्वांनी तरूणास शिवीगाळ करीत लाठ्या-काठ्यांनी व लाथा-बुक्क्यांनी मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी दिली. दिवाकर भालेराव यांच्या फिर्यादीवरून यावल पोलिसात 15 जणाविरुद्ध दंगलीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र साळुंखे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !