धामोडी येथे वीज चोरी : तिघांविरोधात यावल पोलिसात गुन्हा दाखल


Electricity theft in Dhamodi: A case has been registered against three in Yaval police यावल : ऐनपूर, ता.रावेर येथील राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाच्या वतीने धामोडी या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली. यामध्ये गावातील तीन जण वीज चोरी करतांना आढळून आले. या तिघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटानुसार दंडाची रक्कम आकारून दंड अदा करण्याची नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी दंड न भरल्याने ावल पोलिसात वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

वीज चोरी करणार्‍यांच्या गोटात खळबळ
ऐनूपर राज्य विद्युत वितरण कंपनीच्या कक्षाचे सहाय्यक अभियंता देवेंद्र जीवराम महाजन यांच्यासह पथकाने धामोडी, ता.रावेर या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. या मोहिमेत त्यांना जगन्नाथ नामदेव पाटील, मधुकर गबा पाटील व विनोद जगन्नाथ मेढे हे तीन जण वीज चोरी करतांना आढळून आले. गेल्या बारा महिन्यांपासून तिघे वीज चोरी करीत असावे, असा अंदाज वर्तवण्यात आला व त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिट नुसार त्यांना दंडाची रक्कम आकारणी करून दंड भरण्यासंदर्भात नोटीस देण्यात आली मात्र या तिघांनी दंड भरला नाही. तिघांनी दंड भरला नाही म्हणून यावल पोलिसात अभियंता देवेंद्र महाजन यांच्या फिर्यादीवरून तिघांविरुद्ध वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.यावल पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा गुन्हा निंभोरा पोलीस स्टेशन कडे वर्ग करण्यात आला.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !