खडका येथे दोन ठिकाणी धाडसी घरफोडी : 65 हजारांचा ऐवज लंपास


Daring burglary at two places in Khadka : 65 thousand instead of loot भुसावळ : भुसावळ तालुक्यातील खडका येथे चोरट्यांनी दोन बंद घराचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी सुमारे 65 हजारांचा ऐवज लांबवला. 30 डिसेंबर ते 1 जानेवारीदरम्यान हा प्रकार घडला. याप्रकरणी भुसावळ तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शहरी भागात होणार्‍या चोर्‍या-घरफोड्यानंतर चोरट्यांनी आता ग्रामीण भागातही मोर्चा वळवल्याने ग्रामस्थ धास्तावले आहेत.

दोन घरे फोडल्याने खळबळ
आदित्य संतोष चौधरी (19, खडका, ता.भुसावळ) व रमेश मिठाराम सावकारे हे परीवारासह खडका येथे शेजारी-शेजारी वास्तव्यास आहेत. संबंधित गावाला गेल्याने घरे बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधत कडी-कोयंडा तोडून घरात प्रवेश करीत दोन्ही ठिकाणी चोर्‍या केल्या. चोरट्यांनी बेडरूममधील लोखंडी कपाटाचे लॉकर तोडून त्यातील एकूण 64 हजार 500 रुपये किंमतीचे सोन्या-चांदीचे दागिणे लंपास केले. भुसावळ तालुका पोलिसांना घरफोडीची माहिती मिळाल्यानंतर पोलिस निरीक्षक बबन जगताप व सहकार्‍यांनी धाव घेतली. तपास एएसआय श्यामकुमार मोरे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !