वाढवे येथे विजेच्या धक्का तरुणाचा मृत्यू
Youth dies due to electric shock मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथील विट भट्टीवर कामावर असतांना विजेच्या धक्क्याने जखमी झालेल्या तरुणाचा मंगळवार, 2 जानेवारी रोजी सकाळी सातवाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. रवींद्र संतोष चौधरी (38, रा.वढवे, ता.मुक्ताईनगर) असे मयताचे नाव आहे.
उपचार सुरू असताना मालवली प्राणज्योत
रवींद्र चौधरी हा तरुण आपल्या आई-वडील, पत्नी आणि मुलासह मुक्ताईनगर तालुक्यातील वढवे येथे वास्तव्याला होता. वीटभट्टीवर काम करून तो आपला उदरनिर्वाह करत होता. दरम्यान, नेहमीप्रमाणे 29 डिसेंबर रोजी सकाळी रवींद्र चौधरी हा कामावर असतांना त्याला वीटभट्टीजवळ असलेल्या तारांवर ईलेक्ट्रीक वायर टाकत असतांना त्याला विजेचा धक्का लागल्याने गंभीर जखमी झाले. त्याला तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू असतांना मंगळवार, 2 जानेवारी रोजी सकाळी सात वाजता मृत्यू झाला. मयत झालेल्या रवींद्र चौधरीच्या पश्चात आई मिराबाई, वडील संतोष चौधरी, पत्नी रूपाली आणि मुलगा ऋषीकेश असा परिवार आहे.


