यावल शहरात अवैद्य गौण खनिज वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर पकडले


Two tractors carrying raw minerals were seized in Yaval city यावल : यावल शहरातील बोरावल रस्त्यावर नगरपालिकेच्या साठवण तलावाच्या रस्त्याने अवध गौण खनिजाची वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर तहसीलदारांच्या गस्ती पथकाने पकडले. ही कारवाई मंगळवारी सकाळी करण्यात आली. दोन्ही ट्रॅक्टर पंचनामा करीत तहसील कार्यालयात जमा करण्यात आले. ट्रॅक्टर मालकांना दंडाची नोटीस बजावण्यात आली.

अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांमध्ये खळबळ
सातत्याने होत असलेल्या या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूक करणार्‍यांमध्ये खळबळ उडाली आहे. शहरातील बोरावलकडे जाणार्‍या रस्त्यावर नगरपालिकेचा साठवण तलाव असून या तलावाकडील रस्त्यावरून तहसीलदार मोहनमाला नाझीरकर या स्वत: हा गस्तीवर होत्या. त्यांना या रस्त्यावर ट्रॅक्टर (क्रमांक एम. एच. 19 ए.पी. 7342 मालक हेमराज फेगडे, रा.यावल) व ट्रॅक्टर (क्रमांक एम.एच. 40 एल.एच. 1910 मालक भरत कोळी, रा.यावल) हे दोन ट्रॅक्टर अवैध गौण खनिज वाहतूक करतांना मिळून आले. दोन्ही चालकांकडे गौण खनिज वाहतुकीचा परवाना नसल्याने पंचनामा करून दोन्ही ट्रॅक्टर जप्त करण्यात आले तहसील कार्यालयात लावण्यात आले. दोन्ही ट्रक्टर मालकांना दंडाची नोटीस बजावण्यात आली. ही कारवाई तहसीलदार मोहनमाला नाझीरकरसह बामणोदच्या मंडळ अधिकारी बबिता चौधरी, यावलचे तलाठी ईश्वर कोळी, साकळीचे तलाठी मिलिंद कुरकुरे, वाहन चालक अरविंद बोरसे यांच्या पथकाने केली. महसूल प्रशासनाच्या वतीने सातत्याने अवैध गौणखनिज वाहतुकीवर होत असलेल्या कारवाईमुळे अवैध गौण खनिज वाहतूकदारांमध्ये खळबळ उडाली आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !