सुनोदा येथे वीज चोरी करतांना दोघांना पकडले
Two caught stealing electricity at Sunoda यावल : सुनोदा ता. रावेर येथे राज्य विद्युत वितरण कंपनीकडून विविध चोरी विरुद्ध धडक मोहिम राबवण्यात आली यात गावात दोन जण वीज चोरी करतांना आढळून आले. या दोघांना त्यांनी चोरी केलेले वीज युनिटनुसार दंडाची रक्कम आकारणी करून नोटीस देण्यात आली मात्र या दोघांनी दंड भरला नाही. दंड भरला नाही म्हणून दोघांविरुद्ध यावल पोलीस ठाण्यात मंगळवारी वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
निंभोरा पोलिसात गुन्हा वर्ग
तांदलवाडी, ता.रावेर या विद्युत वितरण कक्षाच्या वतीने सहायक अभियंता सचिन गुळवे सहपथकाने सुनोदा, ता.रावेर या गावात वीज चोरीविरुद्ध धडक मोहिम राबवली. यामध्ये त्यांना गिरीश भिकारी सपकाळे व वेडू वावधान सपकाळे हे दोन जण वीज चोरी करतांना आढळून आले. या दोघांना त्यांनी चोरी केलेल्या वीज युनिटनुसार दंडाची आकारणी करून दंड भरण्याची नोटीस बजावली मात्र दोघांनी वेळेत दंड न भरल्याने दोघांविरुद्ध यावल पोलिसात सहायक अभियंता सचिन गुळवे यांच्या फिर्यादीवरून वीज चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. पहा गुन्हा सावदा पोलिस ठाण्यात वर्ग करण्यात आला.


