देवाला कुंकू लावण्याच्या बहाण्याने बोदवड शहरातून पावणेपाच लाखांचा ऐवज लांबवला
On the pretext of slandering the god, a reward of fifty five lakhs was extended from Bodwad city बोदवड : देवाला कुंकू लावण्याच्या बहाण्याने घरात प्रवेश करणार्या भामट्या महिलेने दाम्पत्याचे लक्ष विचलित करीत तब्बल पावणेपाच लाखांचे दागिने लंपास केल्यानी शहरात खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटन बोदवड शहरातील साखला कॉलनीत शनिवार, 30 डिसेंबर रोजी दुपारी 12.25 वाजता घडली. याप्रकरणी अज्ञात महिलेविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
लक्ष विचलीत करीत केली चोरी
बोदवड शहरातील साखला कॉलनीत सुरेखा कैलास शर्मा (45) या पती कैलास शर्मा यांच्यासोबत वास्तव्याला आहेत. शनिवार. 30 रोजी दुपारी 12.25 वाजता त्यांच्या घराजवळ एक महिला आली. तिच्या हातात कुंकूवाचा ताट होता. महिलेने देवाला कुंकू लावण्याचे सांगत घरात प्रवेश केला, त्यानंतर स्वच्छतागृहात गेली. तेथून आल्यावर हातात असलेला रूमाल झटकताच सुरेखा शर्मा व त्यांचे पती कैलास शर्मा बेशुद्ध झाले. त्यानंतर या महिलेने घरातील कपाटातून तीन लाख 25 हजारांची रोकड, 17.5 गॅ्रमची सोन्याची पोत, पाच ग्रॅमची अंगठी, सहा ग्रॅम वजनाचे टोंगल असा एकूण चार लाख 78 हजार 20 रुपयांचा ऐवज लांबवला.


अज्ञात महिलेविरोधात गुन्हा
काही वेळेनंतर दाम्पत्य शुद्धीवर आले असता त्यांना काहीच कळले नाही परंतु काही वेळाने त्यांना पैशांचे काम पडल्याने त्यांनी शोधाशोध केली असता कपाटात असलेली रोकड, दागिने लांबवल्याचे लक्षात आले. याप्रकरणी कैलास शर्मा (51) यांनी बोदवड पोलिसात तक्रार दिल्यावरून अज्ञात महिलेविरोधात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक फौजदार विष्णू शेजोळे करीत आहेत.
