विजेचा शॉक लागल्याने वरणगावातील प्रौढाचा मृत्यू


An adult in Warangaon died due to electric shock भुसावळ : वरणगावातील 48 वर्षीय प्रौढाचा विजेचा शॉक लागल्याने मृत्यू झाला. 22 डिसेंबर रोजी दुपारी चार वाजता आयजुद्दीन कुतुबद्दीन (48, रा. अक्सा नगर, वरणगाव) यांना शॉक लागला होता व जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते मात्र त्यांचा मृत्यू ओढवला. याप्रकरणी गुरूवार, 4 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता वरणगाव पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

उपचारादरम्यान मालवली प्राणज्योत
आयजुद्दीन कुतुबद्दीन हे आपल्या कुटुंबासह वरणगाव येथील अक्सा नगरात वास्तव्याला होते. 22 डिसेंबर रोजी दुपारी 4 वाजता त्यांना विजेचा शॉक लागल्याने नातेवाईकांनी त्यांना तातडीने जळगाव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल केले होते. उपचार सुरू असतांना त्यांची प्राणज्योत मालविली. या घटनेबाबात गुरूवार, 4 जानेवारी रोजी रात्री आठ वाजता वरणगाव पोलिसता अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. पुढील तपास हवालदार नागेंद्र तायडे करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !