भुसावळातील माहिती अधिकार कार्यकर्त्याचा खून : दुसर्‍या आरोपीला अटक


Murder of Right to Information Activist in Bhusawla: Another accused arrested भुसावळ : जुन्या वादातून शहरातील माहिती अधिकार कार्यकर्ता दिलीप रामलाल जोनवाल (53, रा.महात्मा फुले नगर) यांची डोक्यात लोखंडी रॉड मारून निर्घृृण हत्या करण्यात आल्याची घटना मंगळवार, 24 ऑक्टोबर 2023
रोजी भुसावळ शहर पोलिस ठाणे हद्दीतील गरूड प्लॉट भागातील क्रांती चौकात मंगळवारी रात्री 11.45 वाजेच्या सुमारास घडली होती. खून प्रकरणी साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) या संशयितास खूनानंतर अटक करण्यात आली असलीतरी दुसरा संशयित आदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) हा जोनवाल यांच्या हल्ल्यात जखमी झाल्याने त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारानंतर संशयित घरी परतताच त्यास शहर पोलिसांनी गुरुवारी अटक केली. संशयिताला न्यायालयात हजर केले पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.

24 वर्षानंतर घेतला होता हत्येचा बदला
भुसावळ शहरातील गवळीवाडा भागातील दस्तगीर गफूर खाटीक यांची 1999 मध्ये दिलीप जोनवालसह अन्य संशयीतांनी हत्या केली होती. खून प्रकरणात जोनवाल यांच्यावर कारवाईदेखील झाली होती मात्र वडिलांची हत्या करणार्‍यास कायमचा धडा शिकवण्यासाठी मयत दस्तगीर खाटीक यांचा मुलगा आदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) व मयताचा पुतण्या साजीद सगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) यांनी मंगळवार, 24 ऑक्टोबर 2023 रोजी त्यांच्यावर हल्ला करीत खून केला होता. मयत व आरोपींमध्ये झटापट झाल्यानंतर चाकू लागल्याने आदिल जखमी झाल्याने तो उपचार घेत होता तर साजीदला बेड्या ठोकण्यात आल्या होत्या. उपचारानंतर संशयित आदिल घर परतताच त्यास अटक करण्यात आली.



पाच दिवसांची सुनावली कोठडी
खुनातील संशयित आदिल दस्तगीर खाटीक (गवळीवाडा, भुसावळ) यास गुरुवारी अटक केल्यानंतर त्यास शुक्रवारी भुसावळ सत्र न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्यात अ‍ॅट्रासिटीचे कलम लागल्याने तपासाधिकारी पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे उपस्थित होते.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !