चिंचखेडासीमला तुंबळ हाणामारी : सात जणांविरोधात गुन्हा
Chinchkhedaseem stampede : Crime against seven persons बोदवड : बोदवड तालुक्यातील चिंचखेडासीम येथे गटारीतील कचरा काढण्याच्या कारणावरून शाब्दीक वाद हाणामारीपर्यंत पोहोचल्याने तिघे जखमी झाले. ही घटना गुरुवार, 4 रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. याप्रकरणी सात संशयितांविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
सात जणांविरोधात गुन्हा
आकाश प्रकाश पाटील (27, चिंचखेडासीम) यांच्या तक्रारीनुसार, त्यांचा भाऊ गुरुवारी सायंकाळी पाच वाजता गटारीतील कचरा काढत असताना संशयितांना राग आला व त्यांनी वाद घालत त्यांनी फिर्यादीसह त्यांचा भाऊ व चुलत भाऊ गणेश पाटील यांना शिविगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी देविदास उखर्डू इंगळे, भीमराव प्रकाश इंगळे, उत्तम विश्वनाथ इंगळे, शांताराम जनार्दन इंगळे, रवींद्र शांताराम इंगळे, अमोल शांताराम इंगळे, दादाराम विश्वनाथ इंगळे (सर्व रा.चिंचखेडासीम, ता.बोदवड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. नाईक शशिकांत महाले करीत आहेत.


